121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

“Anniversary Wishes for Husband in Marathi” अर्थात “पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” या “पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा” आपण WhatsApp, Pinterest, Tumblr, Reddit, Facebook, Instagram, यांसारख्या social media network वरती share करु शकता. Status ठेऊ शकता. तसेच, download ही करू शकता. तसेच यामध्ये आपण पतीला लग्नाच्या वाढदिवसाचे Quotes, Banner, Message, Image हे सुद्धा पाहणार आहोत.

एका मुला – मुलीचा संबंध दिव्य नात्याने जोडला जातो तो म्हणजे लग्न. पत्नी वरती जीवापाड प्रेम करणारा जो असतो तो म्हणजे तिचा पती. लग्न होऊन जेव्हा मुलगी सासरी जाते त्यावेळी तिला प्राणांतिक जपणारा, तिच्याशी निष्ठेने वागणारा तिचा प्राणप्रिय पती असतो. प्रत्येक पतीची इच्छा असते की Anniversary च्या दिवशी माझ्या पत्नीने मला सर्वात आधी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात आणि पत्नीची सुद्धा जबाबदारी असते की आपल्याला प्राणांतिक जपणाऱ्या पतीला सर्वात आधी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे.चला तर मग आपल्याला प्राणांतिक जपणाऱ्या आपल्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

Anniversary Wishes for Husband in Marathi

सोन्यापेक्षाही सुंदर असलेल्या माझ्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुम्ही माझे पती झाले आणि माझ्या जीवनाला खरा आनंद आणि अर्थ प्राप्त झाला. अशा माझ्या प्राणप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या शिवाय माझे जीवन पूर्णपणे अधुरे आहे. तुम्ही आहात म्हणूनच माझे जीवन आनंदाने भरलेले आहे. माझ्या आदरणीय पती परमेश्वराला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे सुद्धा वाचाAnniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi for Husband

माझ्या जीवनाचे सार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. माझ्या जगण्याची उमेद फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. माझ्या लाडक्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Anniversary Quotes for Husband in Marathi

तुम्हाला प्रथम मी पाहिले आणि तुम्ही माझे हृदय जिंकून घेतले. तुमचे हे परम पवित्र स्थान माझ्या हृदयात असेच कायम राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes in Marathi for Husband

भावना समजण्यासाठी शब्दांची गरज नसते, त्या तर हृदयातून व्यक्त होत असतात. तुम्ही कायमच माझे हृदय जिंकून घेतलेत. माझ्या भावना आणि हृदय जपण्यासाठी खूप – खूप धन्यवाद. माझ्या लाडक्या आणि प्राणप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पतीला लग्नाच्या Anniversary Wishes for Husband in Marathi

तुम्ही नेहमीच माझा आदर करीत आलात. तुमच्या सहवासाने माझे आयुष्य सप्तरंगांनी उजळून गेले. तुमचा सहवास असाच मला लाभत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या आदरणीय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी तुम्हाला प्रथमतः पाहिले आणि तुमच्या प्रेमात पडले. तुमच्याशी विवाह केला आणि लग्न करून सासरी आले. तेव्हापासून ते आजपर्यंत तुम्ही मला अतिशय काळजीने जपले. आपल्या नात्यांमधील विश्वास अधिक दृढ केला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमची हि प्रेमाची आणि विश्वासाची साथ मला अशीच आयुष्यभर लाभो, आपले आरोग्य उज्ज्वल राहो, याच माझ्याकडून आपणाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Husband Anniversary Wishes in Marathi

आपल्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले. अनेक सुखदुःखांची किनार त्याला लाभली. परंतु, आपण मात्र मोठ्या विश्वासाने नेहमीच माझ्यावर आपल्या कृपेचे छत्र धरले. आपल्या नात्यांमधील हा विश्वास असाच दृढ राहो आणि आपली प्रेमाची साथ मला अशीच लाभत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्राणप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marathi Language Marriage Anniversary Wishes for Husband in Marathi

तुम्हीच माझे विश्व आहात. आज पर्यंत तुमच्याच या भावविश्वात मी रममान राहिले. तुमच्यामुळेच आजपर्यंत माझे आयुष्य आनंदाने भरून गेले. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी पावसाळ्यातील सोनेरी किरणे. तुमची साथ अशीच मला लाभत राहो आणि आपल्या नात्यांमधील प्रेम असेच वाढत राहो, याच आजच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणाला हार्दिक शुभेच्छा.

Anniversary Wishes to Husband in Marathi

आपल्या लग्नाला एवढ्या वर्ष होऊन सुद्धा आपल्या पवित्र नात्यांची ही वीण प्रेमाने घट्ट बांधली आहे. असे आपले प्रेमाचे नाते हे अनोखे बंधन असेच घट्ट राहो आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो. याच आपणाला आजच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Happy Anniversary Wishes for Husband in Marathi

जेव्हा माझे तुमच्या सोबत लग्न झाले होते, तेव्हा तुम्ही म्हणाले होतात, की तू सोनेरी पावलांनी या घरात आली आहे, ते अजूनही माझ्या आठवणीत आहे. माझ्या सोन्याच्या पावलांना तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची साथ मिळाली, म्हणून आपले हे नाते दृढ आहे. आपली प्रेमाची साथ अशीच राहू द्या, याच मला माझ्याकडून आपणाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Marathi Language Marriage Anniversary Wishes for Husband in Marathi

पती आणि पत्नी यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा आणि विश्वासाचा सुगंध असेल तरच ते नाते बहरते आणि इतरांना सुद्धा आनंद देते. आपण हा प्रेमाचा ओलावा आणि विश्वासाचा सुगंध मला कायमच दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मंगल प्रसंगी खूप – खूप शुभेच्छा.

Happy Anniversary Wishes in Marathi for Husband

जे पती-पत्नी आपल्या नात्यांचे मूल्य जपतात अशा नात्यांमध्ये आदराची भावना असते. ज्या पती – पत्नींची सुखदुःखात साथ देण्याची तयारी असते, ते नातेच आयुष्यभर जपले जातात. माझे पती सुद्धा असेच नात्यांचे मूल्य जपणारे आणि नेहमी मला सुखदुःखात साथ देणारे आहेत. मी भाग्यवान आहात तुम्ही मला पती म्हणून लाभलात. माझ्या प्राणप्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

1st Anniversary Wishes for Husband in Marathi

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या माझ्या पती राजाला हार्दिक शुभेच्छा.

मी जेव्हा लग्न करून प्रथमतः सासरी आले तेव्हा मला फार भीती वाटली. परंतु, हे माझ्या पती राजा आपण मला प्रेमाने, आदराने सांभाळले. आज आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. आपले माझ्यावरील प्रेम असेच राहू द्या. माझ्या प्राणप्रिय पतीला खूप – खूप आयुष्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या माझ्या पती परमेश्वराला हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment