[2023] New Beautiful Anniversary Wishes in Marathi | [2023] लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi अर्थात “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” म्हणजे एक आनंददायी आयुष्यातील शुभेच्छांचा दिवस. या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण WhatsApp, Pinterest, Twitter, Facebook, Instagram, यांसारख्या social media network वरती share करु शकता. Status ठेऊ शकता. तसेच, download ही करू शकता. तसेच यामध्ये आपण लग्नाच्या वाढदिवसाचे Quotes, Banner, Message, Image हे सुद्धा पाहणार आहोत.

हे कोट्स, बॅनर, मेसेज आपण आपल्या नातेवाईकांना, परिवारातील इतर सदस्यांना, आपल्या मित्र समूहातील सदस्यांना, जे की दांपत्य आहेत, त्यांना share करू शकता. त्यामुळे त्यांना निश्चितच आनंद होईल.

लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक नवरा – बायकोसाठी उत्साहाचा दिवस. हा लग्नाचा वाढदिवस अत्यंत आनंदाने साजरा करण्यासाठी प्रत्येक जोडपे सज्ज असते. आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्तींची साथ आपल्याला लाभत असते. त्यामध्ये नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे असे सर्वांचेच साथ फार मोलाची असते. अशा या आनंददायी “लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा” आपण पाहणार आहोत. या शुभेच्छा आपल्या आयुष्यात निश्चितच आनंद घेऊन येतील, आपले जीवन उत्साहाने भरून टाकतील, असा आम्हाला विश्वास आहे.

Anniversary Wishes in Marathi

सप्तसुरांत तुमचे सूर न्हाऊन निघावे. तुम्हा दोघांची जोडी अशी बहरत जावो. तुमच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित होवो, याच आमच्याकडून आपणाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजपर्यंत तुम्ही दोघांनी तुमच्या पवित्र नात्यांचे बंधन अतिशय आपुलकीने, आदराने आणि प्रेमाने जपले. इथून पुढेही हे प्रेमाचे बंधन असेच जपावे आणि वाढवावे. याच माझ्याकडून आपणाला आजच्या पवित्र लग्नाच्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रिय मित्राला आणि वहिनींना आजच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा दोघांमधील प्रेम असेच वाढत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

तुमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक उत्सवच. हा उत्सव आम्हाला नेहमी साजरा करता येवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा दोघा जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Happy Anniversary Wishes in Marathi

प्रत्येकासाठी लग्नाची गाठ म्हणजे स्वर्ग सुखाचा अनुभव. तुमच्या लग्नाला असे अनेक वर्ष झाले. काळानुसार तुमचे नातेही बहरले. येथून पुढे आयुष्यात सुद्धा तुमच्या लग्नाची गाठ अशीच पक्की राहो आणि तुमचे नाते असेच बहरत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आपणा दोघा उभयंतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्यावेळेस पती-पत्नी हे यज्ञाच्या भोवती सात सप्तपदी घेतात, तेव्हा ते एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देतात. आपण आपल्या आजपर्यंत आयुष्य मध्ये हे नाते अत्यंत सुंदरतेने टिकवले आहे. येथून पुढे सुद्धा आपले नाते असेच टिकून राहो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना. आपणा दोघा दांपत्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes in Marathi

नाते कसे टिकवावे आणि ते प्रेमाने कसे वाढवावे हे आम्ही तुमच्या जोडीकडून शिकलो. आज पर्यंतचे आयुष्यातील वर्ष तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेत. इथून पुढे सुद्धा तुमच्या मधील प्रेम असेच वाढत राहो, याच माझ्याकडून सदिच्छा. आपणा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कुठलेही नाते टिकण्यासाठी त्यामध्ये लागतो प्रेम आणि विश्वास. तुमच्या या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास परिपूर्णतेने भरला आहे, म्हणूनच तुमचे जोडी खूप खास आहे. आपणा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Lovely Couple Marriage Anniversary Wishes in Marathi

आयुष्यात अनेक चढ – उतार आले. अनेक सुख – दुःख आले पण तुम्हा दोघांचे नाते यामध्ये सुद्धा प्रेमाने आणि विश्वासाने टिकून राहिले. तुम्हा दोघा दांपत्यांचे जीवन म्हणजे आमच्या साठी एक महान आदर्श. वाढत्या वयाबरोबर तुम्हा दोघांच्या आरोग्य हे उत्तम राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. माझ्या प्रिय मित्राला आणि वहिनींना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक पती-पत्नीसाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस. आजपर्यंतचे आयुष्य तुम्ही दोघांनी आनंदात घालवले इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा तुम्हा दोघांची जोडी आनंदात राहो, याच माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes in Marathi

तुम्हा दोघा पती-पत्नीच्या एकमेकांप्रती समर्पणामुळेच तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श आहात. तुम्ही दोघांनी तुमच्या जीवनात त्यागाला महत्त्व दिले आणि त्यामुळेच तुम्ही समाजातील इतर व्यक्ती सोबतचे नाते सुद्धा फार विश्वासाने टिकून ठेवले. खरोखरच तुम्हा दोघांचे जीवन फार मोठा आदर्श आहे. तुम्हा दोघांचे नाते असेच बहरत राहो, याच आमच्याकडून सदिच्छा. तुम्हा दोघा आदर्शवादी पती-पत्नींना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

दिवा जसा प्रकाश देतो त्याप्रमाणे तुम्हा दोघांची जोडी आम्हा सर्वांना प्रेमाने, त्यागाने आणि विश्वासाने आयुष्य जगण्याची प्रेरणा देते. तुम्हासारखा व्यक्तींचा सहवास आम्हाला नेहमी आनंदाचा प्रकाश देतो. तुम्हा दोघा दांपत्याचे जीवन आनंदाच्या आणि भरभराटीच्या प्रकाशाने नेहमी भरलेले राहो, याच आम्हा सर्वांकडून तुम्हा दाम्पत्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हा दोघा पती-पत्नीकडून आजपर्यंत आयुष्यात अनेक सत्कार्य घडले. इथून पुढे सुद्धा तुम्हा दोघांकडून असेच सत्कार्य घडत राहो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा दोघा समाजसेवी व्यक्तिमत्त्वाला माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा.

पती-पत्नीचे नाते किती सुंदर असते हे मला तुमच्याकडून शिकायला मिळाले. तुमचे नाते आहे आदर्श, आम्हास प्रेरणादायी. तुम्हा दोघांचेही सुंदर नाते असेच टिकून राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा दोघा दांपत्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes for Couple in Marathi

तुम्हा दोघा पती-पत्नीचे हे गोड नाते असेच बहरत राहो. तुमचे आरोग्य उज्वल राहो, याच माझ्याकडून तुम्हा दोघांना आजच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मंगल प्रसंगी खूप – खूप शुभेच्छा.

नेहमी राहावे आनंदी. मन राहावे प्रफुल्लित. आनंद नांदो आपल्या घरात. याच माझ्याकडून तुम्हा जोडप्याला लग्न वाढदिवसाच्या आनंददायी प्रसंगी खूप – खूप शुभेच्छा.

Anniversary Message in Marathi

पती-पत्नीचे नाते म्हणजे प्रेमाचे, विश्वासाचे आणि आनंदाचे. हे तुमचे प्रेमाचे नाते विश्वासाने आणि आनंदाने असेच टिकून राहो, याच माझ्याकडून सदिच्छा. तुम्हा दोघा पती-पत्नीला आजच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment