[2023] Ganpati Aarti Marathi | गणपती आरती, घालीन लोटांगण

Ganpati Aarti Marathi | गणपती आरती. यामध्ये आपण ganpati aarti marathi lyrics म्हणजेच गणपती आरती जी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे. तसेच, तुकाराम महाराजांकडून “ओंकार प्रधान रूप गणेशाचे” भगवान श्रीगणेशांची प्रार्थना. तसेच, Ghalin Lotangan Lyrics Marathi घालीन लोटांगण ही प्रार्थना श्रीनामदेवजी महाराज यांनी भगवान श्रीविठ्ठलांची स्तुती करताना म्हटली आहे, हे सर्व पाहणार आहोत. हे सर्व आपण WhatsApp, Instagram, Facebook, Pinterest, Twitter, Linkdin यांसारखे social media network वरती share करू शकता. Status ठेवू शकता.

बुद्धीचे दैवत सर्व गुणांची खाण म्हणजे आपले प्रिय गणपती बाप्पा. सर्व देवतांमध्ये सर्वात आधी ज्यांचे पूजन होते ते म्हणजे आपले प्रिय गणपती बाप्पा. सर्व देवी देवता ज्यांना वंदितात ते म्हणजे आपले प्रिय गणपती बाप्पा. सर्व विघ्नांचे नाश करणारे, सर्व जीवांचे उद्धार करणारे, सुखकर्ता असलेले आपले प्रिय गणपती बाप्पा. अशा प्रिय गणपती बाप्पांची आरती आपण आज पाहणार आहोत.

Ganpati Aarti Marathi

भगवान शिवांची तसेच भगवान गणपती बाप्पांची आरती सुद्धा समर्थ रामदास स्वामी यांनीच लिहिलेली आहे.

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकारामजी महाराज आपल्या अभंगातून भगवान श्रीगणेशांची स्तुती करताना लिहितात.

तुकाराम महाराजांकडून भगवान श्रीगणेशांची प्रार्थना

Omkar Pradhan Lyrics

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

हे तिन्ही देवांचे जन्मस्थान || 1 ||

अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णु

मकार महेश जाणियेला || 2 ||

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न

तो हा गजानन मायबाप || 3 ||

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी

पहावी पुराणी व्यासाचिया || 4 ||

गणपती आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती|| धृ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा|
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||

लंबोदर पितांबर फनी वरवंदना|
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा वाट पाहे सदना|
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना || 3 ||

Ghalin Lotangan Lyrics Marathi

संतश्रेष्ठ, जगद्गुरु, नामाचार्य, श्रीनामदेवजी महाराज यांनी भगवान श्रीविठ्ठलांची स्तुती करताना ही प्रार्थना म्हटली आहे. भगवंतांचे प्रेम प्रदान करणारी ही दिव्य प्रार्थना आहे. ही प्रार्थना म्हणजे नामदेव महाराजांनी गायलेली भगवंतांची स्तुती आहे. ही प्रार्थना भक्ती प्रदान करणारी आहे. त्यामुळेच सर्व आरती म्हटल्यानंतर आपण सर्वात शेवटी भगवंतांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी, त्यांची स्तुती गाण्यासाठी या प्रार्थनेचा उपयोग करतो.

हरे राम हर राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे || यांतील “हरे” शब्दाचा अर्थ “राधा” असा आहे.

प्रार्थना

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा
|| 1 ||

त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव || 2 ||

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यम सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि || 3 ||

अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे || 4 ||

हरे राम हर राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे || 5 ||

[2023] Satyanarayan Aarti Marathi | सत्यनारायण आरती Lyrics

[2023] Sonyachya Pavlani Aarti Marathi | सोन्याच्या पावलाने आरती

[2023] Shankar Aarti Marathi | शंकराची आरती

Mahavir Jayanti wishes in Marathi | महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Beautiful Ram Navami Wishes in Marathi | श्रीराम नवमीच्या सुंदर शुभेच्छा

Leave a Comment