[2024] Top 10 Marathi Movie | मराठीतील 10 सर्वात्तम movies

[2024] Top 10 Marathi Movie | मराठीतील 10 सर्वात्तम movies

[2024] Top 10 Marathi Movie | मराठीतील 10 सर्वात्तम movies. यामध्ये आपण 2023 आणि 2024 मधील 10 सर्वात्तम movies पाहणार आहोत.

2023 हे मराठी चित्रपटसृष्टीच्या गतिमान जगात सिनेमॅटिक प्रतिभेचे वर्ष असल्याचे दाखवून दिले आहे, ज्यामध्ये अनेक आकर्षक कथा, उत्कृष्ट अभिनय आणि संस्मरणीय संगीत रचना आहेत. हा लेख 2023 मधील Top 10 Marathi Movie चे परीक्षण करेल, ज्यामध्ये कलाकार, गाणी, गायक, बॉक्स ऑफिसवरील पावती आणि प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या आकर्षक कथानकांसह प्रत्येकाविषयी तपशीलवार माहिती दिली जाईल.

Top 10 Marathi Movie

Subhedar Marathi Movie | सुभेदार

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असलेला सुभेदार हा सिनेमा एक ऐतिहासिक आणि आपल्या इतिहासाच्या महासंग्राम जागा करणारा हा एक अतिशय प्रेरणादायी आणि जीवन समृद्ध करणार Marathi Movie आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला हा चित्रपट दिगपाल लांजेकर यांनी लिखित आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्रोडक्शन पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, मुल अक्षर प्रोडक्शन, राजवारसा प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी संयुक्तपणे केले आहे. तर, या चित्रपटाचे वितरण एवरेस्ट इंटरटेनमेंट आणि एए इंटरटेनमेंट याद्वारा केले गेले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 21 जून 2023 रोजी प्रसिद्ध झाला होता.

Box Office Collection

हा Marathi Movie प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतारला तर समीक्षकांनीही याची फार वाहवा केली आहे. या चित्रपटाने 13.23 कोटींची कमाई केली आहे.

Cast

या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांचे भूमिकेमध्ये चिन्मय मांडलेकर आहे. तर जिजाऊ मा साहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी या आहे. तर स्मिता शेवाळे या सावित्री मालुसरे यांच्या भूमिकेत आहे. सोयराबाईंची भूमिका नुपूर दैठणकर यांनी केली आहे. तर, मातोश्री पार्वतीबाई मालुसरे यांची भूमिका उमा सरदेशमुख यांनी केली आहे.

Singer

या चित्रपटांमध्ये संगीतकारांनी संगीतबद्ध केलेले आणि गीतकारांनी गायलेले गाणे फार प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये “मावळ जागं झालं रं” , “आले मराठी” , “हळद” , “जिजाऊ प्रशस्ती” यांसारखे प्रसिद्ध गाणे आहे. तर हे गाणे गायिले त्या गायकांचे नाव आहेत – देवदत्त बाजी, सुवर्णा राठोड, रोहित राऊत, निधी हेगडे, पूनम गोडबोले, भाग्यश्री अभ्यंकर, मानसी दीक्षित, सुवर्णा कोळी आणि श्रुती देवस्थळी यांनी गायले आहे.

Vaalvi Marathi Movie | वाळवी

2023 मधील एक उत्तम Marathi Movie म्हणजे वाळवी. हा चित्रपट परेश मोकशी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा Marathi Movie 13 जानेवारी 2023 रोजी सर्व चित्रपट गृह मध्ये प्रदर्शित झाला तर 24 फेब्रुवारी 2023 रोजी झी फाईव्ह या ऍपवर डिजिटल स्वरूपामध्ये प्रदर्शित झाला.

Review

परिचय:
फसवणुकीच्या छायांकित कॉरिडॉरमध्ये, अनिकेत आणि अवनीची कहाणी उलगडते, नैतिकतेच्या सीमा ओलांडणारे एक भयानक कथानक उघड करते. त्यांचे जीवन लोभ, विश्वासघात आणि अनपेक्षित परिणामांसह गुंफलेले असताना, कथन अनपेक्षित वळण घेते, ज्यामुळे शेवट हा जितका काव्यमय आहे तितका थरारक आहे.

1: निराशा आणि कपट

अनिकेत आणि अवनी, अपत्यहीन विवाह आणि अवनीच्या मानसिक संघर्षामुळे बांधलेले, आर्थिक उध्वस्त झालेल्या जगाला नेव्हिगेट करतात. अनिकेत, दिवाळखोरीचा दावा करून, अवनीला दुहेरी आत्महत्येच्या गडद करारात सामील होण्यास राजी करतो. अवनीला माहित नाही की अनिकेतच्या हृदयात त्याच्या निराश पत्नीबद्दल तिरस्काराने आणखी एक भयंकर योजना तयार केली आहे.

कायदा 2: परफेक्ट मर्डर प्लॅन

त्याची दंतचिकित्सक मैत्रीण, देविका हिच्याशी जुळवून घेत, अनिकेत एक शैतानी हत्येची योजना रचतो. परिस्थितीचा वारंवार सराव करून, या दोघांचा विश्वास आहे की त्यांनी फसवणूक करण्याची कला पार पाडली आहे. अनिकेतचा आर्थिक त्रास आणि त्यांच्या घरातील फर्निचर काढून टाकणे यामुळे आगामी गुन्ह्याचा मार्ग तयार होतो.

कायदा 3: अनपेक्षित गुंतागुंत

अनिकेत आणि देविकाच्या खुनाच्या परिपूर्ण योजनेचा दिवस येतो, परंतु नशिबाला काही वेगळेच हवे असते. अवनीच्या बेपत्ता होण्याने अनिकेतच्या काळजीपूर्वक मांडलेल्या योजनेला धक्का बसला. अपेक्षीत दुहेरी आत्महत्येऐवजी, अनिकेत अवनीला बेशुद्ध अवस्थेत शोधतो आणि आवेगपूर्ण रागाने तिला गोळ्या घालून ठार मारतो आणि ही आत्महत्या आहे असे भासवतो.

कायदा 4: खोट्यांचे जाळे उलगडले

अनिकेत आणि देविका त्यांचे ट्रॅक कव्हर करण्यासाठी परत येत असताना, त्यांना एक धक्कादायक खुलासा झाला. अवनीचा मृतदेह आणि सुसाईड नोट गूढपणे नाहीशी झाली आणि तिच्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीचा शोध त्यांच्या विकृत वास्तवाला भयावहतेचा एक नवीन स्तर जोडतो.

कायदा 5: एक रहस्यमय प्रकटीकरण

एक रहस्यमय कॉलर, डॉ. अंशुमन, जेव्हा अवनीचा मानसोपचारतज्ज्ञ बनलेला प्रियकर म्हणून स्वतःला प्रकट करतो तेव्हा अंकित आणि देविका षड्यंत्राच्या जाळ्यात अडकतात. अंशुमनशी असलेली अवनीची भावनिक जोड आणि त्याच्या मुलासोबतची तिची गर्भधारणा अनिकेतच्या जगाला उद्ध्वस्त करते. अंशुमनने अवनीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या घटनांचा पर्दाफाश केला आणि अनिकेत आणि देविका यांना धक्का बसला.

कायदा 6: द डेस्परेट अलायन्स

अंशुमनशी युती करण्यास भाग पाडून, हे त्रिकूट अवनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गाडीतून प्रवासाला निघाले. कार अपघाताची संधी समोरून पुढे रक्तपात घडवून आणते, त्यांना तीन वेगवेगळ्या मृतदेहांसह आणि वाढत्या संकटासह सोडले जाते.

कायदा 7: काव्यात्मक न्याय उघड झाला

त्यांच्या भयानक कृत्यांसह घरी परतताना, तिघांना नशिबाच्या क्रूर वळणाचा सामना करावा लागतो. अवनीच्या प्रयोगातून दीमकांमुळे कमकुवत झालेले झुंबर दैवी न्यायाचे साधन बनते. ते खाली कोसळते आणि एकाच वेळी अनिकेत, देविका आणि अंशुमनचे जीवन संपवते.

निष्कर्ष:
“या कथनात लोभ, विश्वासघात आणि दुष्टपणाचे अनपेक्षित परिणाम यांची चित्तथरारक कथा विणली आहे. जसजसे झुंबर पडते, तसतसे ते खुन्याच्या योजनांच्या पतनाचेच नव्हे तर अवनीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या काव्यात्मक न्यायाचे प्रतीक आहे – दीमक.

Cast

स्वप्निल जोशी – अनिकेत

अनिता दाते – अवनी

सुबोध भावे -अंशुमन

शिवानी सुर्वे – देविका

सँडी – तपास अधिकारी

हे मुख्य भूमिकेत आहेत.

Box Office Collection

वाळवी चित्रपट बनवण्यासाठी ३ कोटीपर्यंत खर्च आला आहे. तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७.२५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे.

boyz 4 Marathi Movie | बॉईज 4

आजपर्यंत बॉईज चे जेवढे सर्व भाग झाले ते सर्व यशस्वी झाले. त्यामधीलच 2023 मध्ये रिलीज झालेला बॉईज ४ हा Top 10 Marathi Movie एक उत्तम कॉमेडी असलेला एक यशस्वी चित्रपट झाला आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांनी याची निर्मिती केली आहे. याचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी तर याचे लेखन ऋषिकेश कोळी यांनी केले आहे. हा उत्तम चित्रपट प्रेक्षकांना शाळा आणि महाविद्यालयातील जीवन आणि यानंतरच्या येणाऱ्या अडचणी आणि आव्हान यामधील आनंददायी प्रवासात घेऊन जातो. बॉईज ४ हा चित्रपट 20 ऑक्टोबर २०२३ रोजी थेटर मध्ये सर्वत्र प्रसारित झाला.

या चित्रपटामध्ये प्रामुख्याने विनोद आणि नाटक यांचे मिश्रण आहे हा चित्रपट शाळा आणि महाविद्यालय यानंतरचे त्या व्यक्तींचे जीवन कशाप्रकारे असते याचा शोध घेतो.

रेटिंग

टाइम्स ऑफ इंडिया – ५ पैकी २.५
अर्बनली – ५ पैकी २
imdb – १० पैकी ५.३

Cast

पार्थ भालेराव – धुंगराज
प्रतीक लाड – धैर्यशील
गिरीश कुलकर्णी – मदन
रितिका श्रोत्री – ग्रेस
अभिनय बेर्डे – कुणाल
यतीन कार्येकर – प्राचार्य
गौरव मोरे – नारू
निखिल बने – कुमार
जुई बेंडखळे – नताशा
ऋतुजा शिंदे – प्रोफेसर शेफाली

Singer and Songs

गाणे – बॉयझ रॅप गाणे

गीतकार: हृषिकेश कोळी
संगीत: अवधूत गुप्ते
गायक: अवधूत गुप्ते, प्रतीक लाड, सुमंथ शिंदे, पार्थ भालेराव
लांबी: 3:57

गाणे – गाव सुताना

गीतकार: गणेश आत्माराम शिंदे
संगीत: अवधूत गुप्ते
गायक : पद्मनाभ गायकवाड
लांबी: 3:19

गाणे – ये ना राणी

गीतः अवधूत गुप्ते
संगीत: अवधूत गुप्ते
गायक: अवधूत गुप्ते, वैशाली सामंत
लांबी: 3:19

ऋषिकेश कोळी आणि अवधूत गुप्ते यांच्यासारखे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार याला लाभले असल्याने या चित्रपटातील गाण्यांचे उत्तम सादरीकरण झाले आहे. या चित्रपटातील बॉईज रॅप सॉंग हे शीर्षक गीत 26 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज झाले. हे गाणे सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड यांनी गायले आहे. तर यातील इतर गाणे “ये ना राणी” जे की अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे ते 17 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज झाले. तर यातील अजून एक गाणे असलेले “गाव सुताना” जे की पद्मनाभ गायकवाड यांनी गायले आहे ते 10 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज झाले.

Box Office Collection

हा Marathi Movie एवढा प्रसिद्ध झाला की यांनी दहा दिवसांमध्ये ४ कोटी २० लाखांचा टप्पा पार केला.

Raundal Marathi Movie | रौंदळ

रौंदळ हा Marathi Movie एक जबरदस्त ॲक्शन ड्रामा असलेला साउथ इंडियन मूवी सारखा एक जबरदस्त चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन नाना पडोळे यांनी केले आहे. तर भूमिका फिल्म अँड एंटरटेनमेंट आणि राइज एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट उदयास आला आहे.

या चित्रपटाचे आकर्षक कथानक, नवीन कलाकार आणि जबरदस्त सॉंग यामुळे सर्वच प्रेक्षकांची मने पूर्णपणे जिंकून घेतले आहेत. हा चित्रपट, चित्रपट ग्रहांमध्ये ३ मार्च २०२३ रोजी रिलीज झाला. हा चित्रपट ॲक्शन आणि ड्रामा यांचे संयुक्त मिश्रण असलेला एक उत्तम चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या सीटवर पूर्णपणे खिळवून ठेवतो.

हा Marathi Movie आपल्याला एक अविस्मरणीय असा सिनेमातील अनुभव करून देतो. याचे नावावरूनच आपण जाणू शकतो कि हा action थ्रिलर प्रसिद्ध करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट एकूण ३२० चित्रपटगृहांमध्ये ३ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तगडे कलेक्शन केले आहे.

Cast

शिवराज वाळवेकर – आण्णा

भाऊसाहेब शिंदे – शिवा जाधव

संजय लकडे – बापू

सागर लोखंडे

मंगेश भीमराज जोंधळे

नेहा सोनवणे – नंदा

यशराज डिंबळे – बिट्टू

सुरेखा डिंबळे – शशी जाधव

Singer and Song

“माणूस बहराला”

गीतकार: विनायक पवार
गायिका : वैशाली म्हाडे
लांबी: 5:22


“भलारी”

गीतकार : बाळासाहेब शिंदे
गायक : गणेश चंदनशिव, वैशाली म्हाडे, हर्षित अभिराज
लांबी: 5:49

“धगन आभाळ”

गीतकार: विनायक पवार
गायक: जावेद अली, वैशाली म्हाडे
लांबी: 4:51

“बाप गेला दुर देशी”

गीतकार: विनायक पवार
गायक : सोनू निगम
लांबी: 5:42

“तुफानाची गती”

गीतकार: विनायक पवार
गायिका: दिव्या कुमार
लांबी: 5:17

Rating

टाइम्स ऑफ इंडिया – ५ पैकी ३
एबीपी माझा ५ पैकी ३
सकाळ ५ पैकी ४
IMDB – १० पैकी ७.३

अशाप्रकारे उत्तम गुणांक विविध माध्यमांनी या सिनेमाला दिले आहे.

Box Office Collection

“रौंदळ” या Marathi Movie ने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना ५ कोटी पेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. यामुळे “रौंदळ” सिनेमा 2023 मध्ये मराठी चित्रपटांपैकी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Date Bhet Marathi Movie | डेट भेट

14 जुलै 2023 या दिवशी प्रदर्शित झालेला डेट भेट हा चित्रपट लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे तर अश्विनी शेंडे यांनी याचे लेखन केले आहे. या चित्रपटात रोमँटिक नाटक, आत्मशोधकाची कहाणी आणि एका सुंदर प्रेमाचे वीण यामध्ये केली आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर आहेत.

सोनाली कुलकर्णी ने या चित्रपटात अनया पंडित ची भूमिका केली आहे. ती आधी घाईघाईने लग्न करते. परंतु, नंतर तिला तिच्या लग्नाचा पश्चाताप होतो आणि ती घटस्फोट घेते. त्यानंतर आपल्याला योग्य जोडीदार मिळावा यासाठी ती डेटिंग वेबसाईट कडे वळते. तिला इंग्लंडमधील सॉफ्टवेअर अभियंता रोहन याला भेटायचे असते. परंतु, त्याच वेळेस तिचे एका अभिजीत नावाच्या टॅक्सी चालकाशी भेट होते. त्यानंतर रोहनच्या अयोग्य जीवनशैलीमुळे ती खूप निराश होते आणि या निराशेतून बाहेर पडण्यासाठी ते अभिजीत ची मदत घेते आणि यातूनच त्या दोघांमध्ये अतूट प्रेम संबंध निर्माण होतात. त्यानंतर त्यांचे एकमेकांसोबत भेटणे वाढते. ते एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि त्यांना एक जीवनाचा नवीन मार्ग सापडतो.

Cast

अभिजीत – संतोष जुवेकर

अनया पंडित – सोनाली कुलकर्णी

रोहन – हेमंत ढोमे

मेघा – सुजाता जोशी

अनूचे बाबा – उदय टिकेकर

अनूची आई – मृणाल देशपांडे

आजी – वंदना पंडित

box office collection

डेट भेट या Marathi Movie चे एकूण box office collection 0.25 Cr. एवढे झाले आहे.

Leave a Comment