[2023] Satyanarayan Aarti Marathi | सत्यनारायण आरती Lyrics

Satyanarayan Aarti Marathi | सत्यनारायण आरती Lyrics. यांमध्ये आपण सत्यनारायण आरती lyrics marathi मध्ये पाहणार आहोत. ही सत्यनारायण भगवान यांची आरती तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook, Twitter, Tumblr, Pinterest यांसारख्या social media network वरती share करू शकता. तसेच, Status ठेवू शकता.

सत्यनारायण भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे अवतार. भगवान श्रीकृष्ण या सृष्टी वरती भक्तांवरती कृपा करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतरित होतात, त्यांमधील एक स्वरूप म्हणजे भगवान सत्यनारायण. सत्यनारायण भगवंतांची कथा आणि पूजा आपण घरामध्ये एखादा विवाह झाल्यावरती, तसेच नवीन घर बांधल्यानंतर त्या घराची वास्तुशांती करण्याच्या वेळेस आपण ठेवतो.

सत्यनारायण भगवान फार दयाळू आहेत. सर्वांवरती कृपा करणारे आहेत. सत्यनारायण भगवंत हे सुख, शांती, आनंद, ऐश्वर्य प्रदान करणारे आहेत. जो कोणी सत्यनारायण भगवंतांची पूजा करतो, तो या भौतिक दुःखांपासून मुक्त होतो. तो सर्व त्रासापासून मुक्त होतो. अशा आपल्या प्रिय भगवान सत्यनारायण यांची आरती आपण पाहणार आहोत. ही आरती आणि भगवान सत्यनारायण यांची पूजा आपल्या सर्वांना आनंद प्रदान करेल. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईन, यात तीळमात्र शंका नाही.

सत्यनारायण आरती lyrics marathi

Satyanarayan Aarti Marathi

सत्यनारायण भगवान नाभा मंदिर येथील

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥

पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥

परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥

घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥

प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥

दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥

त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥

भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥

इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥

त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥

स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥

क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥

अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥

मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥

पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥

अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥

ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥

इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥

संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥

राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ।

भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ।

भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥

मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

[2023] Sonyachya Pavlani Aarti Marathi | सोन्याच्या पावलाने आरती

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

143+ Cute Birthday Wishes for Husband in Marathi | सुंदर नवर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

121+ Lovely Anniversary Wishes for Husband in Marathi | प्रेमळ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment