Shankar Aarti Marathi | Shankar Aarti Marathi Lyrics. यांमधील “लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा” । ही आरती तुम्ही WhatsApp, Instagram, Twitter, Facebook, Linkdin, Pinterest यांसारख्या social media network वरती share करू शकता. Status ठेवू शकता.
भगवान शिव यांची आरती समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली आहे. समर्थ रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त भगवान शिव म्हणजे स्वयं भगवान श्रीकृष्णांचे ईश्वरीय स्वरूप. भगवान शिव आदि – अनंत आहेत. परब्रम्ह आहेत. समुद्रमंथनाचे वेळेस 14 रत्नांपैकी एक असलेले “हलाहल विष” त्यातून प्रगट झाले. अशा वेळेस सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली. त्यावेळेस, भगवान शिव सर्वांच्या सहाय्यास धावून आले आणि त्यांनी “हलाहल विष” प्राशन केले. त्यामुळेच, भगवान शिवांचे एक नाव “नीळकंठ” असे पडले.
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या आरतीत सुद्धा “नीळकंठ” असा उल्लेख आहे. असे कृपाळू, दयाळू, अतिशय भोळ्या असलेल्या आणि भक्तांवरती सदैव कृपादृष्टी ठेवणाऱ्या भगवान शिवांची आरती आज आपण पाहूया. जय भोलेनाथ ! जय माता पार्वती !
शंकराची आरती लवथवती विक्राळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव, जय देव, जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥
[2023] Satyanarayan Aarti Marathi | सत्यनारायण आरती Lyrics
[2023] Sonyachya Pavlani Aarti Marathi | सोन्याच्या पावलाने आरती
Mahavir Jayanti wishes in Marathi | महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Beautiful Ram Navami Wishes in Marathi | श्रीराम नवमीच्या सुंदर शुभेच्छा