राष्ट्रपिता महात्मा गांधी – सर्व जगासाठी आदर्श असे महान व्यक्तिमत्त्व. त्यांचे विचार म्हणजे सर्व स्तरातील लोकांसाठी जसे की तरुण, तरुणी, स्त्री, पुरुष या सर्वांसाठी आदर्शवत असेच. अशाच महात्मा गांधींचे Quotes, Images, Status, Messages, Thoughts या महात्मा गांधींच्या जयंतीच्या (2 October) पार्श्वभूमीवर आपण बघणार आहोत. ते तुम्ही Facebook, Instagram, Pinterest, WhatsApp, Twitter यावर share करू शकता तसेच स्टेटस ही ठेऊ शकता.
Mahatma Gandhi Quotes in Marathi
शांतीला कुठलाही पर्याय असू शकत नाही.
आपण ज्याप्रमाणे चांगला विचार करतो, ज्याप्रमाणे चांगले बोलतो, त्याप्रमाणे चांगले वागण्याचीही तयारी ठेवली पाहिजे.
स्वतःला जर योग्य पद्धतीने जाणून घ्यायचे असेल, तर दुसऱ्यांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून द्या
राष्ट्रीय व्यवहारांमध्ये हिंदी भाषेला कार्यामध्ये आणणे देशाच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे.
Mahatma Gandhi Thoughts in Marathi
क्रोधाला प्रेमाने जिंका.
विश्वासाला नेहमी तर्काने जाणून घ्या, कारण विना तर्क विश्वास ठेवणे म्हणजे आंधळेपणा होय.
पृथ्वी माता सर्व जीवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व संसाधने आपल्याला पुरवते. परंतु, मनुष्य आपल्या स्वार्थी भावनेने त्या सर्व संसाधनांचा विध्वंस करतो.
तुमचे भविष्य या गोष्टीवर निर्भर करते की तुम्ही आज काय करत आहात.
महात्मा गांधींचे प्रेरणादायी सुविचार
मानवतेवर विश्वास ठेवा. सूड घेण्याचा विचार सुद्धा मनात आणू नका.
सदा ही विनम्र आणि दृढनिश्चयी रहा.
तुम्ही तोपर्यंत हे समजू शकत नाही की तुमच्यासाठी कोण महत्त्वपूर्ण आहे, जोपर्यंत ते तुम्हाला सोडून जात नाही.
कुटनीतीच्या अधीन होणे दुर्बलता आहे, तिचा विरोध करणे हाच खरा पुरुषार्थ आहे.
Mahatma Gandhi Jayanti Messages in Marathi
आपल्याला मानवतेवरील विश्वास दृढ ठेवायला हवा.
एक चांगला व्यक्ती या सृष्टीमधील प्रत्येक जीवाचा एक चांगला मित्र असू शकतो.
एका देशाची सर्वोच्च संस्कृती हे त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या हृदयात आणि आत्म्यात वास करते.
ज्या ठिकाणी प्रेम आहे, त्याठिकाणीच खरे जीवन आहे.
बदल्याच्या भावनेने वागू नका, कारण बदल्याची भावना संपूर्ण विश्वाला नष्ट करू शकते.
जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात निराशेचे – दुःखाचे प्रसंग आले, तेव्हा मी आठवण करतो ती म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात सत्य आणि प्रेमाच्या मर्गाचाच सदाही विजय होत आला आहे. कितीतरी अत्याचारी – अन्यायी लोग झाले. काही काळासाठी ते आपल्याला वरचढ वाटले. परंतु, शेवटी त्यांचा सर्वनाश हा झालाच. या गोष्टी सदा ही आपण आपल्या स्मरणात ठेवल्या पाहिजेत.
Mahatma Gandhi Jayanti Wishes in Marathi
जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सदाचाराची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आज जन्मदिवस. या जन्मदिवसाच्या, जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आपले सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
ज्यांनी देशासाठी अहोरात्र मेहनत घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्वस्व झोकून दिले. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
ज्यांनी मानव धर्माची शिकवण अवघ्या जगाला दिली. अशा महात्मा गांधी जयंतीच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
Mahatma Gandhi Quotes Images in Marathi
आपले विचार शुद्ध ठेवा. कोणाविषयीही मनात क्रोध बाळगू नका.
प्रेमामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे, की त्याने संपूर्ण विश्व सुद्धा जिंकता येईल. तेव्हा सर्वांवर प्रेम करा.
महात्मा गांधींचे सुविचार छायाचित्रे
तुम्ही जसे बोलता त्याप्रमाणेच कार्य सुद्धा करा.
नेहमी सत्याचाच विजय होतो. कुठल्याही परिस्थितीत सत्यावर टिकून रहा.
Mahatma Gandhi Whatsapp Status in Marathi
चांगले कर्म करण्यात स्वतःला गुंतवून ठेवा. वाईट गोष्टींना रोखण्याचा हा चांगला मार्ग आहे.
Mahatma Gandhi Facebook Status in Marathi
सत्य आणि अहिंसा या मार्गावर चालण्याने विश्वाचे कल्याण होईल.
Mahatma Gandhi Instagram Status in Marathi
तुम्ही जसे विचार करता, त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व बनत असते.
Mahatma Gandhi Quotes for Youth in Marathi
तुम्हाला जर जग बदलायचे असेल तर, आधी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल.
मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे. याचा जर आपण अभ्यास केला तर जग हळुहळू तुमचे ऐकायला लागेल.
सत्याला कुठल्याही प्रकारच्या जनसमर्थनाची गरज नसते. कारण, सत्य सदा ही आत्मनिर्भर आहे.
विश्वास ठेवणे हा एक उत्कृष्ट गुण आहे. अविश्वास हा दुर्बलता निर्माण करणारा एक मूळ घटक आहे.
Mahatma Gandhi Slogans in Marathi
जे व्यक्ती कमजोर असतात, ते व्यक्ती कधीही माफी मागत नाही. क्षमा करणे हा तर ताकदवान व्यक्तीचा विशेष गुण आहे.
पापी व्यक्तीच्या पापाबद्दल मनामध्ये घृणा असू द्या, नाही की पापी व्यक्तीबद्दल.
मी मृत्यूच्या स्वागतासाठी तयार आहे. परंतु, अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्यासाठी मी कोणाला मारण्यास तयार होईल.
याा सृष्टीतील प्रत्येक जण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू शकतो, कारण तोच आपल्या सर्वात जवळचा आहे.