“दसरा” संपल्यानंतर चाहूल लागते ती दिवाळीची. Diwali Wishes in Marathi अर्थात “दिवाळी शुभेच्छा” या लेखात आपण दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा संदेश, दिवाळी छायाचित्रे, हे सर्व मराठीमध्ये बघणार आहोत. ह्या दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali Wishes in Marathi), दिवाळी शुभेच्छा संदेश (Diwali SMS in Marathi), दिवाळी छायाचित्रे ( Diwali Images), दिवाळी शुभेच्छा बॅनर, दिवाळी हार्दिक शुभेच्छा बॅनर हे सर्व तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram, Pinterest यांसारख्या Social media network वर share करू शकता.
Diwali Wishes in Marathi
आली – आली ही दिवाळी आली. घरी सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन ही मंगलदायी दिवाळी आली. अशा या मंगलदायी दिवाळीच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी सण मोठा आनंदाचा नाही तोटा, अशा या आनंदमय दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दीपावलीच्या दीपाप्रमाने आपल्या आयुष्य तेजस्वी होत जावो आणि आपले आयुष्य प्रकाशमान होवो, याच आपणाला दिवाळीच्या शुभेच्छा.
दिवाळी शुभेच्छा
दिवाळी – सण हा दिव्यांचा. सण हा तेजोमयाचा. सण हा नात्यांमधील प्रेम वाढवण्याचा. सण हा स्वादिष्ट फराळाचा. अशा या अनोख्या दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीचा दिवा जसा करतो वातावरण तेजोमय. तसेच तुमचे जीवन होवो तेजोमय. दूर जावो तुमच्या आयुष्यातील सर्व मळभ. याच आपणाला आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा.
दिवाळी ही पहाट चैतन्याची, ही पहाट आहे आनंदाची. हाच दिवाळीचा आनंद आपल्या आयुष्यात सदा वाढत राहो, याच आपणाला या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी शुभेच्छा संदेश
आपल्या घरी महालक्ष्मी मातेच्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि आनंद येवो. दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात आनंद आणि समाधान वाढत जावो. याच आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक वर्षी नवीन रंग घेऊन येते ही दिवाळी, या नव्या रंगांबरोबर प्रफुल्लित होतात दशोदिशा. त्याने उजळतात कर्तृत्वाच्या पाऊलखुणा. अशा या आयुष्यात नवनवीन रंग भरणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
उटण्याचाा सुगंध पसरतो संपूर्ण आसमंतात, दिव्याच्या ज्योतीने उजळून जाते हे संपूर्ण आयुष्य, फटाक्यांच्या आवाजात दुमदुमतो हा आसमंत, रंगीबेरंगी फुलबाज्यांनी तेजोमय होते ही सृष्टी. अशा या अनोख्या आणि आनंददायी दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीचा फराळ असतो खास कारण त्यात असते लाडू, करंजी, चिवडा, चकली, शंकरपाळी, अनारसे खूप खास. म्हणून तर आहे आमची दिवाळी खूप खास. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
रंगीबेरंगी रांगोळी आणि फुलांची आरास, त्याला आहे तेजस्वी दीपाची अनोखी किनार. अशी ही आहे अनोखी आणि शुभ दीपावली खूप खास. अशा या नवीन वर्षाची सुखदायी चाहूल घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी घेऊन येते आनंद आणि उत्साह घरोघरी. दिव्यांच्या तेजाने वातावरण होऊन जाते तेजोमय. अशा या आयुष्य तेजस्वी बनविणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
वसुबारस शुभेच्छा
वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. हा सण म्हणजे गोमातांविषयी प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. अशा या वसुबारसेच्या परम पवित्र सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Dhantrayodashi Wishes in Marathi
धनत्रयोदशी म्हणजेच भगवान धन्वंतरींचा प्रकट दिन. भगवान धन्वंतरींच्या आगमनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भगवान धन्वंतरींच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशी शुभेच्छा
भगवान धन्वंतरी म्हणजे धनाची देवता. भगवान धन्वंतरी यांच्या कृपाआशीर्वादाने आपल्या धनामध्ये नेहमी वृद्धी होत राहो तसेच आपल्या समाधानामध्येसुद्धा वृद्धी होत राहो. याच आपणाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊबीज शुभेच्छा
भाऊ आणि बहीण यांच्या दिव्य नात्याच्या प्रेमाचे अधिष्ठान असलेला सण म्हणजे भाऊबीज. अशा दिव्य भाऊबीज सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भाऊ – बहिण म्हणजे या सृष्टीतील एक अतूट नाते. नाते जपूया. नाते वाढवूया आणि उत्साहाने भाऊबीज साजरी करूया.
Bhaubeej Wishes in Marathi
बहिण – भावाचे नाते आहे त्यागाचे प्रतीक. त्यामुळेच तर या नात्यांमध्ये आहे गोडवा. अशा नात्यांमध्ये गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Happy Diwali Wishes Quotes in Marathi
आनंददायी आणि मंगलमय दिवाळीच्या आपणा संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
कोरोना सारख्या संकटातून संपूर्ण विश्वाची सुटका होऊन आपणा सर्वांचे इथून पुढचे आयुष्य सुखकर होवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हा दिवाळीचा सण आपल्या आयुष्यात नव चैतन्याची पहाट घेऊन येवो आणि आपल्या जीवनातील आनंद सदा वाढत राहो, याच आपणाला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा.
दिवाळी हा भारतीय सण संपूर्ण विश्वात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. आपणही आपल्या या लाडक्या संस्कृतीचे पालन करूया, संवर्धन करूया आणि आपला हा दिवाळीचा उत्सव अतिशय आनंदात साजरा करूया. याच आपणाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी सण हा अध्यात्मिकतेचा सोहळा. सण हा नावीन्य घेऊन येणाऱ्या नवचैतन्याचा. अशा या अनोख्या आणि आनंदमय दिवाळी सणाच्या आपणा संपूर्ण कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा.
Happy Diwali wishes in Marathi
ही भूमी संतांची, ही भूमी विठुराया – रखुमाईची, ही भूमी भगवान शिव – आदिशक्ती अंबाबाईची, ही भूमी आहे शूरवीर अशा छत्रपती शिवरायांची. अशा या मान – सन्मान वाढवणाऱ्या भूमीत साजरा करूया हा दिव्यांचा सण. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
या करोना रुपी राक्षसावर मात करूया. मास्क लावूया. आपले आरोग्य व्यवस्थित जपूया आणि आनंदाने दिवाळी साजरी करूया. याच आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आली – आली दिवाळी आली. मंगलमय पहाट घेऊनी ही आनंददायी दिवाळी आली. दारी सजल्या या सडा – रांगोळ्या. दारी बांधीले हे विजयाचे तोरण. आई अंबाबाई माता आणि आई महालक्ष्मी मातेच्या कृपेने घरात येई सुख, शांती आणि समृद्धी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Diwali Wishes Quotes in Marathi
लक्ष – लक्ष दिव्यांनी उजळून जाऊ दे हा आसमंत आणि नवतेजाने भरून जाऊ दे आपले जीवन. याच आपणाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी असते खूप छान. त्यात लाडू, करंजी, चिवडा खूप छान. त्यात फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी आणि नातेवाईकांच्या आगमनाची असते चाहूल खूप छान. अशा या आनंदमय दिवाळीच्या आपणा सारख्या आनंददायी व्यक्तींना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे अध्यात्मिकतेचा उत्सव. दिवाळी म्हणजे नवचेतनेचा प्रकाश. अशा या आनंददायी आणि मंगलदायी दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Happy Diwali messages in Marathi
दिवाळीचा दिवा देतो तेजाचा प्रकाश. अंधकार नष्ट करुनी देतो चैतन्याचा प्रकाश. आपल्या आयुष्यातीलही सर्व अंधकार नष्ट होऊन आपल्या आयुष्यात चैतन्याची नवीन पालवी फुटावी याच आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दसऱ्यानंतर येते दिवाळी आणि दिवाळी नंतर येते हे नवीन वर्ष. अशा नात्यांमधील प्रेम, आदर आणि गोडवा वाढवणाऱ्या या अनोख्या सणांच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.
दिवाळी आहे आनंदाची, ही पहाट आहे नवचैतन्याची. हा सण आहे मंगलमयतेचा. हा सण आहे दृढविश्र्वासाने नाते जपण्याचा. हा सण आहे ज्योतीच्या तेजाप्रमाणे आपले आयुष्य कर्तृत्वाने उजळण्याचा. अशा या मंगलदायी दिवाळीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
उटण्याचे अभ्यंगस्नान, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे आणि चिवड्याचा फराळ. या सणाला लाभतो सर्व कुटुंबाचा एकसाथ सहवास. होते नवीन – नवीन वस्तूंची खरेदी. आई महालक्ष्मीची पूजा करते हा जीवन धन्य. खऱ्या अर्थाने हा सण आहे खूप खास. अशा या खास दिवाळीच्या आपणा सारख्या खास माणसांना हार्दिक शुभेच्छा.
माता महालक्ष्मी देवीच्या कृपेने आपल्या घरात, सुख, शांती, चैतन्य, समाधान आणि समृद्धी येवो, याच आपणा संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी सण हा रांगोळीच्या सप्तरंगांनी आयुष्यात आनंदाचे आणि चैतन्याचे रंग भरणारा. रांगोळीच्या सप्तरंगाप्रमाणे आपलेही आयुष्य सुंदर आणि तेजस्वी बनत जावो, याच आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Diwali Banner in Marathi
Diwali Status in Marathi
Diwali Wishes Images in Marathi
दिवाळी हा सण लहान – थोरांचा. हा सण आपल्या संस्कृतीचा. हा सण आपल्या अभिमानाचा. हा सण नात्यांमध्ये प्रेम वाढवण्याचा. हा सण रांगोळीने भरलेल्या रंगांचा. हा सण मंगलमयतेचा. अशा या आनंदात वृध्दी करणाऱ्या दिवाली सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी – हा उत्सव आनंदाचा. हा उत्सव नव रंगांचा, हा उत्सव नवीन नात्यांचा, हा उत्सव नव खरीदीचा, हा उत्सव नात्यांना जोडणारा, हा उत्सव घराघरात आनंद घेऊन येणारा. अशा या नवनवीन कलाकृतींनी भरलेल्या दिवाळी सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीला लावतात दिवा. हा दिवा जसा अंधकारामध्ये प्रकाशाची निर्मिती करतो. तसाच हा दिवाळीचा सण आपल्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करून आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, चैतन्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि आपले आयुष्य प्रकाशाच्या या नवतेजाने भरून जावो, याच आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी जो उत्सव आहे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अध्यात्मिक सणांचा. जसे की वसुबारस, धनत्रयोदशी, यमदीपदान, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजन, अभ्यंगस्नान, भाऊबीज, बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा. अशा अनेक अनेक प्रकारच्या सणांचा मिलाप सोबत आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या या पावन उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.