75+ Swami Vivekananda Quotes in Marathi | Swami Vivekananda Jayanti Quotes, Banner, Status in Marathi

Swami Vivekananda Quotes in Marathi | स्वामी विवेकानंदांचे Jayanti Wishes Quotes, Thoughts, banner, status, Slogan, images मराठीमध्ये बघणार आहोत. हे inspirational आणि motivational quotes तुम्ही social media network वर share ही करु शकता. जसे की, Whatsapp, Twitter, Facebook, Linkedin, Instagram. तसेच download ही करू शकता. हे सर्व स्वामी विवेकानंदांचे सुविचार, तुमचे जीवन निश्चितच बदलून टाकेल, याची मला खात्री आहे.

swami vivekananda jayanti wishes 2023: स्वामी विवेकानंद जयंती शुभेच्छा मराठी संदेश,messages, quotes सोशल मीडीयात share करण्यासाठी.

Swami Vivekananda Quotes in Marathi

Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi, Swami Vivekananda Inspirational Quotes in Marathi या मध्ये स्वामी विवेकानंदांचे जीवन बदलणारे सुविचार आपण पाहणार आहोत.

Swami Vivekananda Quotes in Marathi
Swami Vivekananda Quotes in Marathi

तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. यासाठी तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष असू द्या. शब्द हे गौण असतात, विचार मात्र राहतात आणि तेच दूरपर्यंत यात्रा करतात.

आपले मज्जातंतू शक्तिसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू व पोलादी मज्जातंतू हवे आहेत. आपण पुष्कळ दिवस रडलो आता रडणे पुरे. आता आपल्या पायांवर उभे रहा व मनुष्य बना.

कोणत्याही गोष्टीची याचना करू नका. परतफेडीची अपेक्षा सुद्धा ठेवू नका. तुम्हाला जे काही द्यायचे असेल ते सर्व देऊन टाका. तुम्हाला ते परत लाभल्याशिवाय राहणार नाही. परंतु, त्याचा मात्र आत्ता विचार करू नका. ते सहस्त्र पटीने तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण, त्यावर लक्ष ठेवू नका. देण्याची शक्ती संपादन करा. परंतु, दिल्यानंतर त्याचा विचार मात्र करू नका. सर्व जीवनभर तुम्हाला देत राहायचे आहे, हे ध्यानात ठेवा.

Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi

Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi
Swami Vivekananda Motivational Quotes in Marathi

अभ्यास करण्यासाठी जरुरी आहे – एकाग्रता. एकाग्रतेसाठी जरुरी आहे – ध्यान. ध्यानानेच आपण इंद्रियांवर संयम ठेवून एकाग्रता प्राप्त करू शकतो.

आज अत्यावश्यक आहे गीतारुपी सिंहनाद करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची पूजा, धनुर्धारी श्रीरामचंद्र, महावीर हनुमान आणि काली माता यांची पूजा ! तेव्हाच कुठे लोक मोठ्या उत्साहाने कर्म करून शक्तिसंपन्न होतील. आपला सारा देश तमोगुणाने ग्रासून गेला आहे. मनुष्याला कर्म करण्याची प्रेरणा कशापासून मिळते ? तर सामर्थ्यापासून. सामर्थ्य हेच पुण्य आहे आणि दौर्बल्य हेच पाप आहे.

आपण बंधनांमध्ये अडकतो, तर कशामुळे ? आपण दुसऱ्याला काहीतरी देतो, त्यामुळे नव्हे तर आपण कशाची तरी अपेक्षा करतो त्यामुळे. आपण जे प्रेम करतो त्याबद्दल आपल्याला दुःख मिळते. परंतु, आपण प्रेम करतो म्हणून आपल्याला दुःख मिळत नाही तर प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावे अशी आपली अपेक्षा असते म्हणून आपल्याला दुःख मिळते. ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कामना नाही किंवा इच्छा नाही त्या ठिकाणी दुःख सुद्धा नाही. कामना किंवा इच्छा करणे हेच सर्व दुःखांचे कारण आहे.

हे सुध्दा वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी सुविचार

महात्मा गांधींचे प्रेरणादायी सुविचार

स्वामी विवेकानंदांची प्रेरणादायी माहिती

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार

Swami Vivekananda Suvichar in Marathi, Swami Vivekananda Slogan in Marathi, स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार या topic मध्ये स्वामी विवेकानंदांचे ध्येय प्राप्ती बद्दल विचार, स्वामी विवेकानंदांचे प्रत्येक व्यक्तीला योग्य कार्य करायला प्रेरणा देणारे सुविचार आपण पाहणार आहोत. हे सुविचार प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.

Swami Vivekananda Inspirational Quotes in Marathi
Swami Vivekananda Inspirational Quotes in Marathi

प्रत्येक कार्याला तीन वेगवेगळ्या परिस्थितीतून जावे लागते – उपहास, विरोध आणि स्वीकृती.

लोक म्हणतात, “याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा” परंतु, मी म्हणतो, आधी स्वतःवर विश्वास ठेवा. हाच उपाय आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास असू द्या की सारी शक्ती माझ्या मध्येच आहे आणि सर्वकाही करु शकण्याचे सामर्थ्य सुध्दा माझ्या ठिकाणीच आहे. “विष नाही, विष नाही” असे खंबीरपणे म्हटले तर सापाचे विष सुद्धा बाधत नाही.

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार

ज्ञानाचा प्रकाश सर्व प्रकारच्या अंधकार नष्ट करतो.

आपण सर्वजण एका दृष्टीने भिकारीच आहोत. आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काहीना काही मोबदला हा हवा असतो. आपण सारे फार मोठे व्यापारी वृत्तीचे आहोत. आपण आपल्या जीवनाचा व्यापार करतो. सद्गुणांचा सुद्धा व्यापार करतो. धर्माचा सुद्धा व्यापार करतो. अरेरे ! आपण प्रेमाचा सुद्धा व्यापारच करतो.

Swami Vivekananda Quotes Images in Marathi

Swami Vivekananda Quotes Images in Marathi
Swami Vivekananda Quotes Images in Marathi

तुम्ही स्वतःला जसे मानाल तसे व्हाल. तुम्ही स्वतःला जर दुर्बल मानाल तर दुर्बल व्हाल आणि बलवान मानाल तर बलवान व्हाल.

Swami Vivekananda Suvichar
Swami Vivekananda Suvichar

अनेक देशांमधील, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर मी या निष्कर्षावर आलो की संगठणाच्या शक्तीशिवाय या विश्वात महान किंवा स्थायी कार्य होणे अशक्य आहे.

खरे यशाचे वा सुखाचे महान रहस्य आहे ते म्हणजे हे की जो मनुष्य परतफेडीची अपेक्षा करीत नाही, जो पूर्णपणे निस्वा:र्थीपणाने आणि सेवा करतो तोच सर्वात यशस्वी मनुष्य होय. निस्वार्थीपणा हाच फार मोठे विजयाचा कारण आहे. निस्वा:र्थीपणामुळेच असंख्य लोकांना आयुष्यामध्ये खरे यश मिळाले.

Swami Vivekananda Quotes on Education in Marathi

swami vivekananda quotes on education in marathi
swami vivekananda quotes on education in marathi

आपल्याला अशा प्रकारचे शिक्षण हवे आहे – १. चारित्र्य निर्माण करणारे. २. मनाची शक्ती वाढवणारे. ३. बुद्धीचा विकास करणारे. ४. माणसाला स्वतःच्या पायावर उभे करणारे.

आपली जशी पात्रता आहे, त्याप्रमाणेच आपल्याला सर्व काही मिळत असते. जग वाईट आहे आणि आम्ही खूप चांगले आहोत, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते असत्य असते. असे कधीही होऊ शकत नाही. हे भयंकर असत्य आपण स्वतःला सांगत असतो.

स्वामी विवेकानंद सुविचार मराठी

माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे, केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणे हे नव्हे.

Swami Vivekananda Banner

swami vivekananda Banner
swami vivekananda Banner

तुम्ही जसे कर्म कराल तसे व्हाल. दृढविश्वास असू द्या, की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात.

Swami Vivekananda Banner in Marathi

Swami Vivekananda Banner in Marathi
Swami Vivekananda Banner in Marathi

Happy Birthday Swami Vivekananda

स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वामी विवेकानंदां सारखी तेजस्विता आपल्या आयुष्यात येवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

swami vivekananda Jayanti Quotes in marathi

“नरेंद्र विश्वनाथ दत्त” अर्थात “स्वामी विवेकानंदांच्या” 2023 मधील 160 व्या जयंती निमित्त आपण हे विशेष Quotes पाहणार आहोत.

swami vivekananda Jayanti Quotes in marathi
2023 swami vivekananda Jayanti Quotes in marathi

तुम्ही एका वेळी एकाच कार्याला हाती घ्या आणि बाकी सर्व काही विसरुन आपल्या आत्म्याला त्यातच झोकून द्या.

Swami Vivekananda Quotes on Success in Marathi

कोणाचीही निंदा करू नका. जर, त्यांना तुम्ही मदतीसाठी हात देऊ शकत असाल, तर नक्की द्या. परंतु, जर देऊ शकत नसाल तर हात जोडा. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.

swami vivekananda thoughts in marathi

Swami Vivekananda thoughts in marathi यांमध्ये आपण Swami Vivekananda SMS आणि Swami Vivekananda Positive SMS हे मराठी मध्ये बघणार आहोत. आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींमुळे संघर्ष करावा लागतो. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला motivational and inspirational quotes ची साथ लागते. स्वामी विवेकानंदांच्या या Positive SMS मुळे, Positive Quotes मुळे आपले जीवन निश्चितच उज्ज्वल होईल, यात कुठलाही संशय नाही.

swami vivekananda thoughts in marathi
swami vivekananda thoughts in marathi

हजार वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न करा आणि हजारही वेळा अपयशी झालात तरी फिरून एकवार कंबर बांधून पुन्हा प्रयत्न करा.

Swami Vivekananda birthday wishes

स्वामी विवेकानंदांचे आदर्श आपल्या जीवनात येवून आपले जीवनही समृद्ध व्हावे, याच आपणाला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Swami Vivekananda Jayanti Banner in Marathi

swami vivekananda jayanti banner in marathi
swami vivekananda Jayanti Banner in marathi

2023 Swami Vivekananda Jayanti Wishes in Marathi

ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निःस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याचे सामर्थ्य विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या तीन गोष्टी जर त्या व्यक्तीकडे असेल तर अखिल विश्व जरी त्याविरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच सहजपणे तोंड देऊ शकेल.

Swami Vivekananda Quotes for youth in Marathi

ज्यांचा देह इतरांची सेवा करता करता नष्ट होतो, असे व्यक्ती खरोखर भाग्यवान होत.

Swami Vivekanand Quotes on Youth in Marathi

Swami Vivekananda Quotes for Students in Marathi यामध्ये आपण students आणि Youth यांचे चारित्र्य उज्ज्वल करणारे स्वामी विवेकानंदांचे अनमोल सुविचार आपण पाहणार आहोत.

Swami Vivekananda Quotes for Youth in Marathi
Swami Vivekananda Quotes on Youth in Marathi

सर्व धर्मांचे अंतिम ध्येय हे परमेश्वराचा साक्षात्कार करून घेणे हेच होय. परमेश्वराची उपासना हेच सर्वात महान आणि सर्वात श्रेष्ठ असे शिक्षण आहे.

Swami Vivekananda Vichar Marathi

कोणत्याही गोष्टीला घाबरू नका तेव्हाच तुम्ही दिव्य व अद्भुत असे कार्य कराल. ही निर्भयताच क्षणभरात तुमच्यामध्ये परमानंदाची निर्मिती करेल.

एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. एकाग्रतेशिवाय काही करता येत नाही. सामान्य माणूस आपली ९० % विचारशक्ती वाया घालवतो आणि त्यामुळेच अशा मनुष्याकडून नित्य चुका होत असतात. ज्याच्या मनाला वळण लागलेले आहे, असा मनुष्य कधीही चुका करणार नाही.

Swami Vivekananda Quotes on Students in Marathi

Swami Vivekananda Quotes for Students in Marathi
Swami Vivekananda Quotes on Students in Marathi

स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा. गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

स्वामी विवेकानंद विचार मराठी

केवळ यथार्थ ब्रह्मचार्य पालनाने समस्त विद्या एका क्षणामध्ये आत्मसात करता येतात. एकदाच ऐकलेले व समजलेले कायमसाठी लक्षात राहू शकते. या ब्रह्मचर्याच्या अभावी आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेला आहे.

Swami Vivekananda Jayanti wishes

उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसले आहात तोपर्यंतच निश्चयाचा महामेरू बांधा. उठा आणि कार्य करा. नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले असे पुष्पच परमेश्वराच्या चरणी अर्पण करावयाचे असते. हीच ती शुभ वेळ आहे.

Leave a Comment