95+ Gudi Padwa Wishes in Marathi | 95+ गुढी पाडवा शुभेच्छा

95+ Gudi Padwa Wishes in Marathi | 95+ गुढी पाडवा शुभेच्छा. या लेखात आपण 2023 या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा, संदेश, बॅनर, ग्रिटींग्ज, छायाचित्रे, माहिती, स्टेटस हे सर्व पाहणार आहोत. हे तुम्ही Whatsapp, Facebook, Twitter, Instagram, Pinterest, LinkedIn यांसारख्या social media network वर Share करु शकता. Status ठेऊ शकता. तसेच, download ही करु शकता.

Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa wishes in Marathi
Gudi Padwa wishes in Marathi

गुढी उभारूया भगव्याची, गुढी उभारूया स्वातंत्र्याची आणि सन्मानाची, गुढी उभारूया नवनिर्मितीची. अशा या मराठी नववर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Gudi Padwa information in Marathi | गुढी पाडवा सणाबद्दल माहिती मराठीमध्ये –

या लेखाला सुरुवात करण्याआधी ‘राजाधिराज, योगिराज छत्रपती संभाजी महाराजांना’ आणि कवी कलशांना आपण वंदन करूयात. याच गुढी पाडव्याच्या दिवशी धर्मवीर, रयतेचे लाडके राजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे परममित्र कवी कलश यांनी ४० दिवसांचा अतिशय कठीण असा त्रास, अतिशय कठीण अशा हालअपेष्टा रयतेसाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी सहन करून अतिशय उच्च प्रतीचे असे बलिदान दिले की, ज्याची आपण कोणीही स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही. अशा या रयतेच्या दैवताला वारंवार प्रणाम. वढू व तुळापूर नावाच्या तीर्थक्षेत्राला वारंवार प्रणाम. छत्रपती संभाजी महाराजांचे व कवी कलशांचे बलिदान उराशी बाळगून आपण या गुढीपाडव्याच्या लेखाला सुरुवात करूया.

छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश वाचण्यासाठी येथे click करा.

स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी सुविचार, संदेश वाचण्यासाठी येथे click करा.

‘गुढीपाडवा’ हा मराठी नवीन वर्षातील पहिला सण. याच दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा या सणाचा एक मुहूर्त आहे. याचा उल्लेख ‘वेदांग ज्योतिष’ या ग्रंथात आढळतो. आचार्य लगध मुनी लिखित हा एक ज्योतिष शास्त्र विषयी ज्ञान देणारा प्रसिद्ध ग्रंथ आहे.

१. गुढी पाडवा म्हटला की आठवतो, छत्रपती संभाजी महाराजांचा आणि कवी कलशांचा बलिदान दिवस. स्वराज्यासाठी, धर्मासाठी ४० दिवसांचा अतिशय कठीण असा त्रास, अतिशय कठीण अशा हालअपेष्टा सहन करून ११ मार्च १६८९ या गुढी पाडव्याच्या दिवशी धर्मवीर, राजाधिराज, योगिराज छत्रपती संभाजी महाराजांनी आणि कवी कलशांनी स्वराज्यासाठी, मायबाप जनतेसाठी अतिशय उच्च प्रतीचे असे बलिदान दिले की, ज्याची कल्पना आपण स्वप्नात सुद्धा करू शकत नाही.

२. या दिवसाचे व या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे, याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रजी १४ वर्षाचा वनवास पूर्ण करून व रावणाचा अंत करून अयोध्येला परत आले. प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता व बंधू लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी अयोध्येत सडा, रांगोळ्या घातल्या गेल्या. सगळीकडे दिवे लावले गेले. गुढ्या उभारल्या गेल्या . गोडाधोडाचा नैवेद्य बनविला गेला. असा सर्वांना आनंद प्रदान करणारा हा सण आहे.

३. या सणाचे दुसरे विशेष महत्त्व म्हणजे ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली.

४. माता पार्वती आणि भगवान शिव यांचे लग्न सुद्धा पाडव्याच्या दिवशीच ठरले. या दिवसापासून लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. तर, तृतीयेच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यात विवाह झाला.

५. माता पार्वती म्हणजेच आदिशक्तीची पाडव्याच्या दिवशी पूजा केली जाते. या उत्सवाला ‘चैत्र नवरात्री’ म्हणतात. यावर्षीची ‘चैत्र नवरात्री’ २२ ते ३० मार्च या कालावधीत आहे.

६. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शालिवाहन नावाच्या राजाची. सातवाहन वंशातील हा एक प्रसिद्ध राजा. शालिवाहन राजालाच गौतमीपुत्र सातकर्णी असे म्हणतात. सातकर्णीच्या आईचे नाव ‘गौतमी’ तर, पित्याचे नाव ‘शिवस्वाती’ होते. आपल्याकडे जसे आता ‘पितृसत्ताक’ पद्धती आहे. तशी त्यावेळी ‘मातृसत्ताक’ पद्धती सातवाहन राजांमध्ये रूढ होती. म्हणून ते आपल्या अगोदर मातेचे नाव लावीत असत.

शालिवाहनचे पिता हे राजा असतात. परंतु, आपल्याच सामंतांनी धोका दिल्यामुळे त्यांना राज्य सोडून वनात आश्रय घ्यावा लागला. त्या वनात एका सत्यशील कुंभाराच्या घरामध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे शालिवाहनचे बालपण हे त्याच कुंभाराच्या घरात झाले.

शालिवाहन यांना देवतांकडून वरदान प्राप्त झालेले असते. त्या वरदान नुसार ते कुठल्याही मूर्तीमध्ये प्राण आणून तिला जिवंत करू शकत असत. त्यानुसार शालिवाहन यांनी ६000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या सर्व पुतळ्यांमध्ये मंत्रोच्चाराद्वारे प्राण आणले. त्यानंतर जेव्हा शालिवाहन आणि शक यांच्यामध्ये लढाई झाली. त्यावेळेस याच सैनिकांच्या मदतीने राजा शालिवाहन यांनी शकांचा पराभव केला. यानंतर राजा शालिवाहनच्याच नावाने ‘शालिवाहन शक’ सुरू झाले.

सर्व सण ( जसे की होळी, दिवाळी, दसरा, महाराष्ट्र दिन, गणेश चतुर्थी, श्रीकृष्ण जन्माष्टमी ) यांसारख्या विविध सणांचे, उत्सवांचे शुभेच्छा, संदेश, बॅनर, छायाचित्रे बघण्यासाठी येथे click करा.

2023 Gudi Padwa Panchang, Date, Muhurat in Marathi | 2023 गुढी पाडवा पंचांग, दिनांक, मुहूर्त मराठीमध्ये –

दिनांक – 22 मार्च 2023, वार – बुधवार

प्रतिपदा तिथी चालू – रात्री 09 वाजून 22 मिनिटांनी, 21 मार्च 2023.

प्रतिपदा तिथी समाप्ती – संध्याकाळी 06 वाजून 50 मिनिटांनी, 22 मार्च, 2023.

Gudi Padwa Banner in Marathi

“Gudi Padwa Banner”, “Gudi Padwa Banner in Marathi” यामध्ये आपण गुढी पाडव्याचे best बॅनर बघणार आहोत. ते तुम्ही share तसेच download करु शकता.

Gudi Padwa Banner in Marathi
Gudi Padwa Banner in Marathi

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची ही अनोखी आस. जोडूया नवी नाती, वाढवूया नात्यांमधील प्रेम. अशा या मंगलमय गुढी पाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

गुढी पाडवा बॅनर

गुढी पाडवा बॅनर
गुढी पाडवा बॅनर

गुढी पाडवा शुभेच्छा बॅनर

“गुढी पाडवा शुभेच्छा बॅनर” यामध्ये आपण “गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा banner” बघणार आहोत.

गुढी पाडवा शुभेच्छा बॅनर
गुढी पाडवा शुभेच्छा बॅनर

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

गुढी पाडवा म्हणजे नवीन वर्षाची आनंदमय सुरुवात. तेव्हा या अनोख्या आणि आनंदमयी सुरुवातीसाठी आपण “गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर”. तसेच, “नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर” प्रामुख्याने बघणार आहोत.

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Gudi Padwa SMS in Marathi

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे ‘गुढी पाडवा’. हा गुढी पाडव्याचा 2023 – नववर्षाचा सण आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशा आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

जशी झाडांना चैत्राची नवी पालवी फुटते, तशी तुमच्याही आयुष्यात आनंदाची, सुखाची पालवी फुटो, अशा या 2023 – नववर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2023 वर्षीच्या गुढी पाडवा सणाच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

गुढी पाडवा शुभेच्छा संदेश

“गुढी पाडवा शुभेच्छा संदेश”, “गुढी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी” यामध्ये आपण गुढी पाडव्याचे शुभेच्छा संदेश बघणार आहोत.

2023 यावर्षीचा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात सुख. शांती, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

2023 या नवीन वर्षाच्या, मंगलमय अशा गुढी पाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Gudi Padwa Quotes in Marathi

गुढी पाडवा सण मोठा. आनंदाला नाही तोटा. अशा 2023 वर्षीच्या गुढी पाडव्याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

2023 या वर्षीचा गुढी पाडवा तुमच्यासाठी उज्ज्वल दायी आरोग्य घेऊन येवो. तुमची अध्यात्मिक आणि भौतिक प्रगती होवो . तुमच्या यश आणि कीर्ती मध्ये वृद्धी होवो, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना.

Gudi Padwa Status in Marathi

Gudi Padwa Status in Marathi
Gudi Padwa Status in Marathi

Leave a Comment