आजच्या या जबरदस्त लेखात आपण Swami Vivekananda best information in Marathi, स्वामी विवेकानंदांची महत्त्वपूर्ण माहिती मराठीमध्ये बघणार आहोत. ती तुम्ही social media network वर share ही करु शकता. जसे की, whatsapp, twitter, facebook, linkdin . सर्व स्वामी विवेकानंदांचे सुविचार, तुमचे जीवन निश्चितच बदलून टाकेल, याची मला खात्री आहे.
Swami Vivekananda best information in Marathi | स्वामी विवेकानंदांविषयी छान आणि प्रेरणादायी माहिती मराठीमध्ये –
आता आपण स्वामी विवेकानंदांचे जीवन चरित्र संक्षिप्त रुपात बघणार आहोत. त्यामुळे, तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या सुविचारांबरोबर त्यांच्या जीवन चरित्रा बद्दल सुद्धा काही अंशी माहिती मिळेल.
स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी ‘मकर संक्रांतीच्या’ पवित्र दिवशी झाला. त्यांच्या मातेचे नाव ‘भुवनेश्वरी देवी’ तर पित्याचे नाव ‘विश्वनाथ दत्त’ होते. स्वामीजींचे मूळ नाव ‘नरेंद्रनाथ’ हे होते. स्वामीजींच्या माता या ‘महादेवाच्या’ भक्त होत्या. त्यांची भगवान शिवांवर अतूट श्रद्धा होती. भगवान शिवांच्याच कृपाशिर्वादाने स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता.
स्वामीजींचे वडील हे कोलकात्यातील एक प्रसिद्ध वकील होते. नरेंद्रनाथ हे बालपणी खूप खोडकर होते. सुंदर चाणाक्ष, खोडकर, अतिशय बुद्धिमत्ता असलेले ‘नरेंद्र’ हे बालक घरातील सर्वांचे तसेच शेजाऱ्यांचेही अतिशय लाडके होते. लहानपणी त्यांना प्रेमाने सर्वजण ‘बिले’ या नावाने हाक मारत.
लहानपणीच नरेंद्र गंभीर आशा ध्यानात राहत असे. त्यांचे वाचन दांडगे होते. ग्रहणशक्ती व स्मरणशक्ती अलौकिक होती.अलौकिक अशा शक्ती लहानपणीच या बालकामध्ये प्रकट झाल्या होत्या. नरेंद्रनाथ हे खऱ्या अर्थाने एक दैवी शक्ती लाभलेले बालक होते.
लहानपणापासूनच नरेंद्रचा भगवंतांवर गाढ विश्वास होता. आता तरुण वयात आल्यानंतर त्यांना आस लागली होती ती ‘ईश्वर दर्शनाची’. त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्यांना अधिकारी व्यक्तीची, गुरूंची आवश्यकता होती. काही कालांतराने दैव योगाने त्यांची होणाऱ्या गुरूंसंगे भेट झालीच.
नरेंद्रनाथांच्या गुरूंचे नाव ‘श्रीरामकृष्ण परमहंस’. श्रीरामकृष्णांनी नरेंद्रनाथांना दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘विवेकानंद’ ठेवण्यात आले. श्रीरामकृष्णांनी विवेकानंदांना आदेश दिला की, आता तुलाच या जगाचा उद्धार करायचा आहे.
तमोगुणाकडे चाललेल्या जगाला तुलाच ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवायचा आहे. मी माझ्याकडील जे सर्व काही अध्यात्मिक ज्ञान आहे ते तुला दिले आहे. त्या सर्वांच्या साह्याने तू ईश्वराचे महत्व जगाला समजावून दे.
दीनदुबळ्या लोकांना मदत कर. त्यांचा आधार हो. अशा सूचना त्यांनी विवेकानंदांना दिल्या . त्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार स्वामीजींनी कार्य करण्यास सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केले, तीर्थक्षेत्र बघितली. संतांच्या, महापुरुषांच्या भेटी घेतल्या.
एकदा श्रीरामकृष्ण परमहंस स्वामीजींच्या स्वप्नात आले व त्यांनी आज्ञा दिली की, तुम्ही विदेशात जाऊन अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करावा.
त्यानंतर स्वामीजींनी श्रीरामकृष्णांच्या पत्नी श्रीशारदामातांची परवानगी घेऊन परदेशात जाण्याचे ठरवले. त्यानंतर ३१ मे १८९३ ला गुरूंच्या मंगलमयी इच्छा, आज्ञा यांना जीवनात सर्वोच्च स्थान देऊन स्वामीजींनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेला जाण्याचे ठरवले.
जगातील सर्व धर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी येणार होते. ११ सप्टेंबर १८९३ ! सोमवार या दिवशी भरलेल्या या सर्वधर्म परिषदेला स्वामीजींनी दिलेल्या भाषणाने तेथे उपस्थित असलेले सर्वजण मंत्रमुग्ध झाले. सर्वांनी स्वामीजींनी अध्यात्मिक विषयावर केलेल्या मार्गदर्शनावर टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर अनेक वर्ष जगभरातील विविध देशांमध्ये ‘वेदांताचा’ प्रसार केल्यानंतर ते भारतात परतले.
त्यावेळेस प्रचंड अशा जनसमुदायाने त्यांचे भव्य असे स्वागत केले. त्यांची भव्य अशी मिरवणूक काढली गेली. आपल्या देशवासीयांचे एवढे प्रेम पाहून स्वामीजी भारावून गेले. वर्षानुवर्षे स्वामीजींनी कठोर परिश्रम केले. त्यांनी अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, लोकांना खऱ्या सुखाकडे – ईश्वर प्राप्ती कडे नेण्यासाठी आपले सर्वस्व वाहून दिले.
गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची सेवा करता करता स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष केले. स्वामीजी आपल्याला हेच सांगतात की, ईश्वरप्राप्तीसाठी, अध्यात्मिक ज्ञानासाठी, आत्म बलिदानासाठी, दीनदुबळ्यांच्या व भारत मातेच्या सेवेसाठी, सदैव तत्पर रहा. तेच आपले कर्तव्य होय.
अखेरीस ४ जुलै १९०२ या दिवशी जपमाळ जपत असतानाच रात्रीच्या ९ च्या सुमारास स्वामीजी ईश्वर धामाला प्राप्त झाले. त्यावेळेस या भारत मातेच्या वीर सुपुत्राचे वय अवघे ३९ वर्षे होते. अशा दिव्य आत्म्याला वारंवार प्रणाम.
रामकृष्ण मिशन
जगभरामध्ये अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणारी आणि तरुणांचे जीवन उज्ज्वल बनविण्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणजे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन ही “वेदांत” तत्वज्ञानाचा प्रचार, प्रसार करणारी जगातील एक प्रमुख अध्यात्मिक संस्था आहे.
या जगप्रसिध्द संस्थेची स्थापना श्रीरामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य श्री स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 ला बेलूर मठ, कोलकाता येथे केली.
या संस्थेला “रामकृष्ण मिशन” असे नाव देण्याचे कारण म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस ह्यांच्या आदर्श अशा विचारांचा तसेच “वेदांत” तत्वज्ञानाचा म्हणजेच वेदांच्या ज्ञानाचा जगभरात प्रचार, प्रसार करणे होय.
रामकृष्ण या संस्थेचे जगप्रसिद्ध घोषवाक्य आहे ते म्हणजे “आत्मनो मोक्षार्थं जगद् हिताय” अर्थात आपल्या मोक्षासाठी आणि जगाचे हित जपण्यासाठी महान असे कार्य करणे.