आजच्याया नवरात्रोत्सवाच्या विशेष लेखात आपण 2023 – नवरात्रौत्सव मुहूर्त, पंचांग, 52 शक्तीपीठे, माहिती मराठीमध्ये बघणार आहोत. ती माहिती तुम्ही Facebook, Instagram, Twitter, WhatsApp यांसारख्या social media network वर share करू शकता.
2023 – नवरात्रौत्सव माहिती –
नवरात्रौत्सव – दुर्गामाता, माता आदिशक्तीचा हा पर्व. प्रत्येक वर्षामध्ये 4 वेळा नवरात्री येते. परंतु, अश्विन महिन्यात येणारी नवरात्री ही विशेष आहे. या महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला “शारदीय नवरात्री” असे म्हणतात. ही नवरात्री अतिशय मोठ्या अशा उत्सवाच्या रुपात संपूर्ण जगभर साजरी केली जाते.
2023 या वर्षातील नवरात्रौत्सव 15 ऑक्टोबर या दिवसापासून चालू होतो. या दिवशी घट बसतात. म्हणून या नवरात्रौत्सवाच्या प्रथम दिवसाला “घटस्थापना” असे म्हणतात. तर 23 ऑक्टोबर या दिवशी “नवरात्रौत्सव” समाप्त होतो. तर 24 तारखेला “विजयादशमी” अर्थात “दसरा” आहे.
या नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता आदिशक्तीची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा केली जाते.
जिथे – जिथे आदिशक्तीचे प्रसिद्ध शक्तिपीठे आहेत. अशा ठिकाणी नवरात्रौत्सव काळात भाविक – भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. अशा प्रकारे मोठ्या आनंदोत्सवात नवरात्रौत्सव साजरा केला जातो.
जगभरात विविध ठिकाणी देवी मातेंच्या प्रतिमेची स्थापना केली जाते. त्या ठिकाणी भव्य अशी सजावट केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी देवी मातेंच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी अपट्याची पाने वाटून नवरात्रौत्सवाचा समारोप होतो.
नवरात्रौत्सवात दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करणाऱ्या भक्तांना देवी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतात. भक्तांचे सर्व दुःख – कष्ट दूर होतात.
नवरात्रौत्सवात घर, वाहन, भूमी, आभूषणे, वस्त्रे, अलंकार, रत्ने हे खरेदी करणे शुभ मानले जाते.
आपल्याला ज्या काही नवीन शुभ कार्यांचा आरंभ करायचा आहे. त्यासाठी हा काळ शुभ मानला जातो.
यावर्षी हत्तीवरती आरूढ होऊन येणार दुर्गामाता –
यावर्षी दुर्गामाता हत्ती वरती स्वार होऊन येणार आहे. म्हणजेच यावर्षीचे दुर्गा मातेचे वाहन हत्ती असणार आहे. आपण नेहमी पाहतो, दुर्गामाता सिंहावरती आरूढ असतात. परंतु, नवरात्रीच्या काळात प्रत्येक वर्षी देवी मातेचे वेगवेगळे वाहन असते. तर, यावर्षी देवी माता हत्तीवरती आरूढ होऊन येणार आहे. त्यामुळे, यावर्षी नवरात्रीच्या काळात जास्त पावसाची शक्यता आहे.
2023 – घटस्थापना दिनांक, पंचांग, शुभ मुहूर्त –
यावर्षीची नवरात्री 15 ऑक्टोबर पासून चालू होऊन 23 ऑक्टोबर या दिवशी समाप्त होईल. तर 24 तारखेला “विजयादशमी” अर्थात “दसरा” आहे.
घटस्थापना शुभ मुहूर्त – सकाळी 11:44 मि. ते 12:30 मि. पर्यंत.
दुर्गा मातेचे नवरात्रीचे नऊ रूपे
15 ऑक्टोबर 2023 – शैलपुत्री माता – प्रतिपदा तिथि
16 ऑक्टोबर 2023 – ब्रह्मचारिणी माता – द्वितीया तिथि
17 ऑक्टोबर 2023 – चंद्रघंटा माता – तृतीया तिथि
18 ऑक्टोबर 2023 – कुष्मांडा माता – चतुर्थी तिथि
19 ऑक्टोबर 2023 – स्कंद माता – पंचमी तिथि
20 ऑक्टोबर 2023 – कात्यायनी माता – षष्ठी तिथि
21 ऑक्टोबर 2023 – कालरात्रि माता – सप्तमी तिथि
22 ऑक्टोबर 2023 – महागौरी माता – दुर्गा अष्टमी
23 ऑक्टोबर 2023 – महानवमी माता – नवमी तिथि
24 ऑक्टोबर 2023 – दुर्गामाता प्रतिमा विसर्जन अर्थात “दसरा” – दशमी तिथि
24 अक्टूबर 2023 – मां दुर्गा प्रतिमा विसर्जन, दशमी तिथि (दशहरा)
दुर्गा मातेंची 52 शक्तीपीठे –
- हिंगलाज – कराची पासून 125 कि. मी. अंतरावर स्थित आहे.
- शर्कररे ( करवीर ) – कराचीच्या सुक्कर स्टेशन जवळ शर्कररे हे शक्तीपीठ आहे.
- सुगंधा – सुनंदा – बांगलादेशच्या शिकारपुर मधील बरशिल पासून 20 कि. मी. अंतरावर सोंध नदीच्या किनारी हे शक्तीपीठ आहे.
- काश्मीर – महामाया – काश्मीरमधील पहलगाव जवळ महामाया हे शक्तीपीठ आहे.
- ज्वालामुखी – सिद्धिदा ( अंबिका ) – हिमाचल प्रदेशातील कांगडा मध्ये हे शक्तीपीठ आहे.
- जालंधर – त्रिपुर मालिनीी – पंजाबच्या जालंधर मधील छावणी स्टेशनजवळ हे शक्तीपीठ आहे.
- वैद्यनाथ – जयदुर्गा – झारखंडच्या देवघर मध्ये वैद्यनाथ हे शक्तीपीठ आहे.
- नेपाळ – महामाया – नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराजवळ गुजरेश्वरी मंदिर येथे हे शक्तीपीठ आहे.
- कैलास मानसरोवर ( दाक्षायाणी ) – कैलास मानसरोवर येथील मानसा जवळ हे शक्तीपीठ आहे.
- विरजा – विरजाक्षेत्र – उडीसाच्या विराजजवळ उत्कल येथे हे शक्तीपीठ आहे.
- नेपाळ – गंडकीी- नेपाळमध्ये गंडकी नदीकिनारी पोखरा नावाच्या ठिकाणी मुक्तिनाथ नावाचे प्रसिद्ध स्थान आहे. हे माता आदिशक्तीचे प्रसिद्ध शक्तिपीठ आहे.
- पश्चिम बंगाल – बहुला (चंडिका) – पश्चिम बंगाल राज्यातील वर्धमान या शहरापासून 8 कि. मी. अंतरावर केतुग्राम जवळील अजेय नदीच्या किनारी हे शक्तीपीठ आहे.
- पश्चिम बंगाल – उज्जयिनी – मांगल्य चंडिका – पश्चिम बंगाल मधील वर्धमान शहरापासून 16 कि. मी. अंतरावर गुस्कुर स्टेशन जवळच्या उज्जयिनी नामक स्थानी हे शक्तीपीठ आहे.