तुमचा खरा संघर्ष हा अधिकारी झाल्यानंतर सुरू होतो. कारण, त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजामध्ये बदल घडवून आणायचा असतो.

- IAS, श्री. तुकाराम मुंढे

लहानपणापासूनच तुकाराम मुंढे यांना संघर्ष करण्याची सवय लागली होती. ज्या वयात लहान मुलांचे खेळण्या – बागडण्याचे वय असते. अशा वयात तुकाराम मुंढे शेतात काम करत असत.

तुकाराम मुंढे यांचे मोठे बंधू बीडला शिक्षण घेत होते. परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे पुरविणे अवघड जात होते.

2004 साली त्यांनी UPSC चा 4 था attempt दिला  11 मे 2005 साली लागलेल्या निकालात ते भारतात 20 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.