तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. यासाठी तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष असू द्या. शब्द हे गौण असतात, विचार मात्र राहतात आणि तेच दूरपर्यंत यात्रा करतात.
कोणाचीही निंदा करू नका. जर, त्यांना तुम्ही मदतीसाठी हात देऊ शकत असाल, तर नक्की द्या. परंतु, जर देऊ शकत नसाल तर हात जोडा. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
तुम्ही एका वेळी एकाच कार्याला हाती घ्या आणि बाकी सर्व काही विसरुन आपल्या आत्म्याला त्यातच झोकून द्या.
केवळ यथार्थ ब्रह्मचार्य पालनाने समस्त विद्या एका क्षणामध्ये आत्मसात करता येतात. एकदाच ऐकलेले व समजलेले कायमसाठी लक्षात राहू शकते. या ब्रह्मचर्याच्या अभावी आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेला आहे.
ज्यांचा देह इतरांची सेवा करता करता नष्ट होतो, असे व्यक्ती खरोखर भाग्यवान होत.
माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे, केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणे हे नव्हे.
आपल्याला अशा प्रकारचे शिक्षण हवे आहे – १. चारित्र्य निर्माण करणारे. २. मनाची शक्ती वाढवणारे. ३. बुद्धीचा विकास करणारे. ४. माणसाला स्वतःच्या पायावर उभे करणारे.